सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी : सख्या भावाला पेट्रोल टाकून पेटवले, सुपे येथील घटना

Admin
सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी : सख्या भावाला पेट्रोल टाकून पेटवले, सुपे येथील घटना

वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी 

सुपे ता. बारामती नजीक काळखैरेवाडी येथे घराच्या वादातून धाकट्या भावाने थोरल्या भावाला पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रकार  घडला.
उपचारादरम्यान थोरला भाऊ मारुती वसंत भोंडवे वय ४८ यांचा शुक्रवार ता. १४ दुपारी  बारा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. बुधवार ता. १२ रात्री साडे आकराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. धाकटा भाऊ अनिल वसंत भोंडवे वय ३२ याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. येथिल राजबाग परिसरात दोघेही राहतात मयत मारूती पत्नी सविता मुलगा महेश व हर्षद असे पत्र्याचे घरात असतांना आरोपी  अनिल रात्री घराजवळ येऊन म्हणाला की तु वेगळे राहा ,आमचेत राहु नकोस असे म्हणत  घराचे खिडकीच्या काचा फोडुन  घराच्या दरवाजाची बाहेरुन कडी लावुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने खिडकीतुन मारूतीच्या अंगावर पेट्रोल टाकुन काडीने पेटवुन दिले. यावेळी अंगावरील पेटती कपडे विझविणेस पत्नी सविता ही आली असता तिला ही ठिकठिकाणी भाजले आरडा ओरडा करून इतरांच्या मदतीने दवाखान्यात नेले पुणे येथिल ससुन रूग्नालयात गुरूवार ता. १३ पोलिसांनी जबाब नोंदवला. शुक्रवारी मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. याबाबतचा अधिक पोोोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत करीत आहेत.
To Top