आज बारामतीत दिवसभरात १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Admin
आज बारामतीत दिवसभरात १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल बारामती मध्ये एकूण ९६ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी प्रतीक्षेत असलेल्या उर्वरित १३ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये  ११ जणांचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे ,आज दिवसभरामध्ये सकाळचे सहा व आत्ताचे ११ असे एकूण १७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत, पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामध्ये ग्रामीण भागातील ८ व बारामती शहरातील ९ असे रुग्ण आहेत व बारामतीची रुग्ण संख्या एकूण १६५ झाली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
         पॉझिटिव्ह आलेल्या अकरा रुग्णांमध्ये बारामती शहरातील 5 व  त्यामध्ये जाधव वस्ती फलटण रोड येथील दोन रुग्ण पाटस रोड येथील एक रुग्ण दाते पेट्रोल पंपाशेजारील एक रुग्ण व समर्थ नगर येथील एक रुग्ण असे पाच व राजबाग काळखैरेवाडी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील तीन रुग्ण गुणवडी येथील बारामती हॉस्पिटल मधील पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील दोन रुग्ण व होळ येथील एक  रुग्णाचा समावेश आहे
To Top