सुपेकरांकडुन कोरोना रोखण्यात यश : विविध उपायांचा झाला परिणाम

Admin
सुपेकरांकडुन कोरोना रोखण्यात यश : विविध उपायांचा झाला परिणाम

सुपे प्रतिनिधी- दीपक जाधव

बारामती तालुक्यातील सुपे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्यावतीने विविध उपाय योजना राबविल्याने कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश आले आहे. 
         गेली पाच महिन्यापासुन संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे गावोगावी विविध स्तरावर उपाय योजना राबवण्यात येत आहे. येथे कोरोना विषाणुच्या संसर्गापासुन लढा देण्यासाठी सरपंच स्वाती हिरवे, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर आणि गावकामगार तलाठी दिपक साठे तसेच पोलीस प्रशासन यांनी वेळोवेळी सुचना केल्या. तर आरोग्य विभागाच्यावतीने घरटी सर्वेक्षणाचे काम केले. तसेच मध्यंतरीच्या काळात नविन येणाऱ्यास गावाच्या बाहेर विलगिकरण करण्यात येत होते. यावेळी गावात फक्त हॉस्पिटल, मेडीकल आणि किराणा दुकाने वगळता इतर दुकानांवर कडक निर्बंध आणुन बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे गर्दीची ठिकाणे न झाल्याने संसर्ग होण्याचा प्रकार आपोआपच थांबला. 
        तसेच सुप्यात ग्रामपंचायतीच्यावतीने अर्धा लिटर सॅनिटायजर, दोन साबन, अनिल हिरवे मित्र मंडळाच्यावतीने ८ हजार मास्क तर सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत प्रत्येक कुटुंबाला अर्सनिक अल्बम गोळ्या वाटप करण्यात आले. 
        बारामती तालुक्यात सुपे ही सर्वात मोठ्या लोकसंख्येची बाजार पेठ आहे. या अंतर्गत जवळपास सुमारे ४० वाडी- वस्ती गावांचा समुह आहे. या गावंचे रोजचे दळणवळण सुपे येथे होते. त्या अनुशंघाने सुपे ग्रामपंचायत मार्फत तसेच गावातील विविध स्वंयसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आदींच्या माध्यमातून विविध उपाय योजना राबविण्यात आल्या.
       दरम्यान सुरूवातीच्या काळात ग्रामपंचायत सुपेच्यावतीने सॅनिटायझर, साबण, औषध फवारणी, सोशल डिसटन्सचे नियम, काटेकोरपणे गाव बंद, योग्य व्यवस्थापन, बाजार बंद, बाजार समितीला सुचना, शाळा परिसर सुचना, गावातील व्यापारी व बाजार करी यांनाच फक्त मंडई भरवण्याची परवानगी, संस्थात्मक विलगीकरण सुविधा, त्यांना सर्व सुविधा , दंवडी देणे, सुचना फलक, मुख्य बाजार पेठ बंद ठेवणे, चेक पोस्ट उभारणी, युवकांमार्फत चेक पोस्ट सुविधा, मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई, मंदीरे बंद, ग्राम दैवत व दर्गा परिसर बंद व गावाची यात्रा बंद , केली आहे, व्यवसायकांना वेळोवेळी सुचना केल्यामुळे सुपेकरांनी कोरोनाला रोखण्यत यश आले. 
      ...........................................
To Top