आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या सहकार्यातुन वाणेवाडीतील १४०० कुटुंबाना गोळ्यांचे वाटप

Admin
आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या सहकार्यातुन वाणेवाडीतील १४०० कुटुंबाना गोळ्यांचे वाटप

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या सहकार्यातून वाणेवाडी गावातील १४०० कुटुंबांना रोगप्रतिकारक शक्ती गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 
           वाणेवाडीचे माजी सरपंच व बारामती व इंदापूर सुपरवायझिंग युनियनचे अध्यक्ष दिग्विजय जगताप यांनी सभापती काकडे यांच्याकडे वाणेवाडी गावातील प्रत्येक उंबऱ्याला या गोळ्या मिळाव्यात अशी मागणी केली होती. यानुसार काकडे यांनी वानेवाडीतील १४०० कुटुंबाला या गोळ्या वाटप करण्यात आल्या. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि झिंक या गोळ्यांचा समावेश आहे. 
           वाणेवाडी या ठिकणी नुकताच हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रम भोसले, दिग्विजय जगताप, सरपंच स्मिता काकडे, उपसरपंच संजय जगताप, ग्रामसेवक गाढवे, सर्व सदस्य अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. आठ दिवसापूर्वी काकडे यांच्या सहकार्यातुन वयोवर्षं  ६० वरील नागरिकांना या गोळ्या वाटप करण्यात आल्या होता. आता या गोळ्या ४० वर्षावरील नागरिकांना वाटप करण्यात येणार आहेत. वाणेवाडीतील गावठाण, दत्तवाडी, चव्हाणवाडी, रामनगर, विकासनगर आणि मळशी याठिकाणी येत्या दोन दिवसात या गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत. 
To Top