बारामती मार्केट कमिटी मध्ये शेतमाल तारण कर्ज योजना सुरू
बारामती : प्रतिनिधी
शेतक-यांचा शेतमाल काढणी हंगाम चालु झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी येत
असल्याने शेतमालाचे बाजारभाव खाली येतात. त्यामुळे शेतक-यांचे आर्थिक नुकसान होते. सदर शेतमाल
साठवणूक करून काही कालावधी नंतर विक्री केल्यास त्या शेतमालाची वाढलेल्या भावाने विक्री होऊन
शेतक-यांना जादा दर मिळु शकतो. सदर बाब विचारात घेऊन शेतक-यांना रास्त बाजारभाव मिळावा या
दृष्टीकोनातुन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने सन २०२०-२०२१ या हंगामासाठी शेतमाल तारण कर्ज
योजना सुरू केली आहे. तरी शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान सभापती अनिल खलाटे
यांनी केले आहे.
सध्या मागणी व पुरवठा यानुसार शेतमालाचे दर लिलावात निघत आहेत. तसेच कोरोना प्रादुर्भावामुळे
शेतीसह शेतमाल प्रोसेसिंग युनिटवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतमालाचे दरावर त्याचा परिणाम झाला
आहे. त्यामुळे शेतमालाचे लिलावात दर कमी आहेत. वाळलेल्या, स्वच्छ व सर्वसाधारण दर्जाचे शेतमालाचे
दर हमीभावा पेक्षा जादा निघत असुन कमी प्रतिच्या शेतमालाचे दर हमीभावा पेक्षा कमी आहेत. त्यामुळे
शेतक-यांनी वाळलेला व स्वच्छ शेतमाल विक्रीस आणावा. काही शेतमालाचे दर हमीभावा पेक्षा कमी
असल्याने शेतक-यांनी बाजार समितीचे गोडाऊन मध्ये शेतमाल ठेवुन शेतमाल तारण कर्ज योजनेत
सहभागी व्हावे. या योजनेत शेतकरी सहभागी झाल्यास सदर शेतमालावर हमीभावाप्रमाणे किंवा बाजारभावा
दरानुसार ५० ते ७० % तारण कर्ज दिले जाईल. यासाठी गोडाऊन भाडे नाही असे सचिव अरविंद जगताप
आणि उपसभापती बाळासो पोमणे यांनी माहिती दिली.
COMMENTS