महिलेचा चिमुकल्या मुलासह विहिरीतआढळला मृतदेह : वडगाव निंबाळकर येथील प्रकार

Admin
महिलेचा चिमुकल्या मुलासह विहिरीतआढळला मृतदेह : वडगाव निंबाळकर येथील प्रकार 

वडगाव निंबाळकर  दि २८
संतोष भोसले 

विवाहित महिलेचा आपल्या चुमुकल्या मुलांसह विहिरीत मृतदेह आढळून आल्याचा प्रकार वडगाव निंबाळकर ता. बारामती येथे सोमवार ता. २८ सकाळी सात वाजता आढळून आला. 
       सुषमा प्रमोद लोणकर वय २६ वीर प्रमोद लोणकर  वय ११ महीने अशी मृतदेहांची नावे आहेत. गावाशेजारील चिलाईचा मळ्यात विहिरीत दोन्ही मृतदेह आढळले.  त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. लोणकर यांच्या कुटुंबातील एका व्यक्तिला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मृत सुषमा यांनी माहेरी सोडवा असा आग्रह पतीकडे रविवारी ता. २७ रात्री धरला होता.  प्रापंचिक मानसिक ताण व भीतीपोटी महिलेने गावाशेजारील चिलाईचा मळा परिसरातील एका विहिरीत चिमुकल्यासह पहाटेच आत्महत्या केल्याचे बोलले जाते. सकाळी कुटुंबातील सदस्यांनी आसपास शोध घेतला असता विहिरीत मृतदेह दिसले. पोलिसांना माहिती देउन मृतदेह बाहेर काढण्यात आले. 
To Top