सोमेश्वर कारखान्यावर कोविड सेंटर उभारावे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

Admin
सोमेश्वर कारखान्यावर कोविड सेंटर उभारावे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

 सभासद व ग्रामस्थांच्या मागणीनुसार सोमेश्वर कारखान्यावर  'कोवीड सेंटर'  होणेबाबत सुचना कराव्यात अशी मागणी सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्षण गोफणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
             गोफणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  आपल्या बारामती तालुक्यात झपाटयाने कोरोनाचा
प्रादुर्भाव वाढत असून तालुक्याच्या पश्चिम भागातील कोवीड पेशंटला बारामती येथे उपचारासाठी ठेवलेस पेशंटचे जेवणाची व पाण्याची व्यवस्था करणे नातेवाईकास अत्यंत गैरसोयीचे होत आहे.
त्याकरीता कारखान्याचे सभासद, तालुक्याच्या पश्चिम भागातील पक्षाचे कार्यकर्ते ग्रामस्थ यांची
इच्छा आहे की, श्री सोमेश्वर कारखान्यावर 'कोवीड सेंटर' निर्माण केल्यास तालुक्याच्या पश्चिम भागातील कोवीड पेशंटची देखभाल व उपचार करणेसाठी सोयीचे होईल व नागरिकांची मोठी अडचण दूर होईल.
तरी श्री सोमेश्वर कारखान्यावर कोवीड सेंटर ओपन करणेबाबत संबंधितांना आपणामार्फत
जरुर त्या सूचना व्हाव्यात. असे निवेदनात म्हटले आहे
To Top