पुणे जिल्हा लाल परीच्या विभाग नियंत्रक पदी सोमेश्वरच्या सुपुत्राला संधी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
हेमंत गायकवाड
सोमेश्वरनगर (करंजेपुल) ता. बारामती येथील रमाकांत गायकवाड यांची एस टी महामंडळ पुणे जिल्हा विभाग नियंत्रकपदी निवड निवड करण्यात आली आहे.
गायकवाड हे एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक म्हणून सोलापूर येथे कार्यरत होते. त्यांची सोलापूर येथून पुणे येथे विभाग नियंत्रक म्हणून नियुक्ती बदली करण्यात आली आहे.
बारामती तालुक्यात करंजेपुल येथील रहिवासी असणारे रमाकांत गायकवाड यांनी बारामती येथे आगारात आगार व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून देखील काम पाहिले आहे. ते आता पुणे जिल्हयाचे विभाग नियंत्रक म्हणून काम पहाणार आहे. सोमेश्वर येथील परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या भागातील सुपुत्र जिल्ह्याचा लाल परिचा कारभार बघनार असल्याने आनंद व्यक्त केला.