पुणे विभागातील 1 लाख 84 हजार 382 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 2 लाख 50 हजार 650 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Pune Reporter

पुणे विभागातील 1 लाख 84 हजार 382 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,  विभागात कोरोना बाधित 2 लाख 50 हजार 650 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

       पुणे,दि.03 :- 

पुणे विभागातील 1 लाख 84  हजार 382  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2  लाख  50 हजार 650 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या    59 हजार 596  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6  हजार 672 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण    2.66 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.56  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील   कोरोना बाधीत एकूण  1 लाख 77  हजार  282  रुग्णांपैकी  1 लाख 37 हजार  638 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 35 हजार 498  आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.34  टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण   77.64 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 15  हजार  247 रुग्णांपैकी  8 हजार 151  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  6 हजार  666 आहे. कोरोनाबाधित एकूण 430 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18  हजार 882   रुग्णांपैकी 14 हजार 242  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 871  आहे. कोरोनाबाधित एकूण 769  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  13  हजार 897  रुग्णांपैकी 7  हजार 927  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5  हजार  428 आहे. कोरोनाबाधित एकूण 542  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 25  हजार 342  रुग्णांपैकी 16  हजार 424  रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  8 हजार 133  आहे. कोरोनाबाधित एकूण 785  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6  हजार 151  ने वाढ झाली आहेयामध्ये पुणे जिल्ह्यात  3 हजार 535सातारा जिल्ह्यात 589 सोलापूर जिल्ह्यात 456 , सांगली जिल्ह्यात 735  तर कोल्हापूर जिल्ह्यात 836  अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 11 लाख 81 हजार 138  नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2  लाख 50 हजार 650  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

टिप :- दि2 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वापर्यंतच्या आकडेवारीनुसार )

To Top