अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Admin
अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

दौंड व दौंड परिसरात प्रवीण शिंदे नावाचा इसम हा मुलींकडून  वेश्याव्यवसाय करून घेत आहे. अशी माहिती मिळताच  पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी त्यांच्या पथकाला कारवाई बाबतचे आदेश दिले.

        पाटस गावचे हद्दीत टोल नाक्याजवळ सोलापूर पुणे लेनचे दक्षिणेस सुलभ शौचालयाचे पश्चिमेस मोकळे जागेत इसम नामे प्रवीण रामदास शिंदे वय २७ रा.यळपणे ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर हा पीडित मुलगी वय वर्षे १७ रा.दौंड ता.दौंड जि. पुणे हिचे कडून अनैतिक शारीरिक व्यापार करवून घेताना मिळून आला असून त्यांचे कडून एकूण ३९,१००. रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध यवत पोलिस स्टेशन येथे स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ४,५,७, व ८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

        पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि पृथ्वीराज ताटे,सफौ.सागर चव्हाण,पोहवा.मुकुंद अयाचीत,पोहवा.महेश गायकवाड,पोहवा.निलेश कदम,पोहवा.उमाकांत कुंजीर,पोहवा.सचिन गायकवाड मपोहवा.लता जगताप,पोना.सुभाष राऊत,पोना.गुरुनाथ गायकवाड,पोशि.अक्षय जावळे यांनी ही कारवाई केलेली आहे.

To Top