दुकानदारांनो सावधान......तुम्ही होऊ शकता ब्लॅकमेल..

Admin
दुकानदारांनो सावधान......तुम्ही होऊ शकता ब्लॅकमेल..

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक  औदुंबर पाटील साहेब यांनी बारामतीमध्ये होणाऱ्या काही गैर प्रकाराबद्दल सावधानी बागळण्याचे आव्हान केले आहे.
        सध्या बारामतीमध्ये काही जोडपी टोळी सक्रिय आहे. ही जोडपी दुकानात खरेदीच्या बहाण्याने ग्राहक बनून आत येतात आणि दुकांदाराबरोबर गैरवर्तन केल्याबद्दल वाद घालतात. ते त्यांच्या महिला साथीदाराला वाईट नजरेने बघितले, गैरवर्तन केले असे आरोप दुकांदारावर करून, पोलीसात तक्रार करेन असे धमकावून पैसे उकळण्याचा, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात.
      तरी सर्व दुकानदारांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि असे काही प्रसंग घडले तर तत्पर पोलीस स्टेशनला फोन करून माहिती द्यावी.
तसेच जर कोणी तृतीयपंथी व्यक्ती, एखाद्या दुकानदाराला किंवा नागरिकांना त्रास देत असेल तर त्याबद्दल सुध्दा पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आव्हान पोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील साहेब यांनी केले आहे.

संपर्क-
बारामती पोलीस स्टेशन - 100 / 224333
श्री.औदुंबर पाटील साहेब - 9967425298
To Top