परींचे गावात ऍक्टिव्ह सर्व्हेत एक पॉझिटिव्ह : ६५३ कुटुंबाची तपासणी

Admin
परींचे गावात ऍक्टिव्ह सर्व्हेत एक पॉझिटिव्ह : ६५३ कुटुंबाची तपासणी

परींचे : प्रतिनिधी

पुरंदर तालुक्याीतील परींचे येथील संशयित १८ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकच नागरिक पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 
            माझे कुटुंब माझी जबाबदारी अतर्गत बुधवार दि. ७  रोजी परींचे (ता. पुरंदर) १३ पथकांनी गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. नागरिकांची ऑक्सि जन लेवल, पल्स, थर्मल स्क्रिनींग करण्यात आले. दिवसभरात आढळलेल्या १८ संशयित रुग्णांची करोना टेस्ट करण्यासाठी गावातील माध्यमिक विद्यालयात पाठवण्यात आले. यामध्ये १८ संशयित व्यक्ती पैकी १ व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 
    या कामी १३ पथके, १३ पर्यवेक्षक, १ अँटीजेन स्वॅब कलेक्श्न सेंटर, १ टेस्टिंग टीम,  १ रुग्णवाहिका,  ११ प्राथमिक शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक म्हणून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या वेळी परींचे गावचे प्रशासक महादेव कांबळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार, आरोग्य पर्यवेक्षिका सुनंदा शिंदे,  तलाठी जगताप, ग्रामसेवक शशांक सावंत, माजी सरपंच समीर जाधव, स्वयंसेवक उपस्थित होते.
To Top