दुबईतल्या आयपीएल वर शिरूर मधून सट्टा : ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Admin
दुबईतल्या आयपीएल वर शिरूर मधून सट्टा : ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

 दुबई येथे सुरु असणाऱ्या आय.पी.एल. क्रिकेट सामन्यावरती शिरूर येथे ऑनलाइन सट्टा घेणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची  कारवाई केली.  
       काल  दि. ९ रोजी शारजा स्टेडियम दुबई येथे सुरू असलेल्या  राजस्थान रॉयल  व  दिल्ली कॅपिटल  यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या ड्रीम इलेव्हन  ट्वेंटी-ट्वेंटी  सामन्यावर  शिरूर हलवाई चौक येथे  राहते घराचे तिसऱ्या मजल्यावर राहुल गोरख  घोडके  हा  बेटिंग घेत असल्याबाबत पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट  यांना बातमी मिळाली, त्यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि पृथ्वीराज ताटे , पोसई अमोल गोरे, सहा.फौज.दयानंद लीमन, पो.हवा. रौफ इनामदार, पो.ना. मोमीन, शेळके, म.पोना कांबळे,  पो.कॉ.अक्षय जावळे यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, इसम नामे राहुल गोरख घोडके हा बेटिंगचे साहित्य जागेवर टाकून त्याचे बिल्डींग वरुन बाजूचे बिल्डींगवर पळून गेला.
सदर ठिकाणावरून एक इंटेक्स कंपनीचा एलसीडी टीव्ही , विवो कंपनीचा मोबाईल फोन, रोख रक्कम रुपये 12280, दोन फुलस्केप रजिस्टर, एक सेट टॉप बॉक्स असा एकूण 73,505/- रुपये  किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याचेवर जुगार प्रतिबंधक अधिनियम  प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई, डॉ अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण मिलिंद मोहिते अपर पोलीस अधीक्षक  बारामती,.उपविभागीय अधिकारी श्री धस  वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट  यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि  पृथ्वीराज  ताटे  पोसई अमोल गोरे सफौ दयानंद लिम्हण
पोहवा रौफ इनामदार,  पोना जनार्दन शेळके पोना राजू मोमीन  म पो ना पुनम कांबळे पोशि अक्षय जावळे यांनी केलेली आहे.
To Top