जमिनीच्या वादातून मारहाण : सात जणांवर गुन्हा दाखल

Admin
जमिनीच्या वादातून मारहाण : सात जणांवर गुन्हा दाखल

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

जळकेवाडी ता बारामती येथे जमिनीच्या वादातून दगड आणि काठ्यांनी मारहाण केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 
           याबाबत  जितोबा रघुनाथ कदम वय ६५ वर्ष  रा. जळकेवाडी  ता बारामती यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावर पोलिसांनी अभिजीत मोतीलाल कदम, मोतीलाल जयंवत कदम, मनोज मोतीलाल  कदम, रणजीत मोतीलाल  कदम,  गणेश बाळासो कदम,   बाळासो जयवंत कदम  आणि विजय मोतीलाल कदम सर्व रा. जळकेवाडी  ता बारामती जि पुणे यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
              याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी यांचे जळकेवाडी येथे जमीन गट नं 3 मधील असणारे जमीनीचे वादाचे कारणावरूण आरोपीत अभिजीत मोतीलाल कदम याने फिर्यादीच्या घरासमोर उभा असताना फिर्यादी याना शिवीगाळ करून दगड मारला त्यानंतर वरील सर्व आरोपींनी यांनी हातात काटया व दगड घेवुन यांचे घरात घुसुन फिर्यादीचा भाउ पंडीत यास  हातातील काठीने त्यांचे डावे हातावर मारहान केली तसेच  हात धरून हाताने लाथाबुक्यांनी व काठीने मारहान केली. फिर्यादी चा  पुतन्या सागर यांस  हाताने व त्यांच्या जवळील काठीने मारहान केली.  व पुतण्या अक्षय यास देखील मारहाण केली. तसेच फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देवुन घराची काच फोडली.
To Top