मोढवेत डी.जे. वरील डान्स नडला : नवरदेवसह एकावर गुन्हा दाखल
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मोढवे (राजपुरेवस्ती) ता बारामती येथे एका लग्न समारंभात ५० ते ६० एकत्र येत डी जे वर डान्स केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी नवदेवसह डी जे मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ज्ञानेश्वर पांडुरंग सानप यांनी फिर्याद दाखल केली होती. यावरून वडगाव पोलिसांनी सागर बाळासाहेब गायकवाड मुळ रा.राजपुरेवस्ती मोढवे ता.बारामती जि.पुणे सध्या रा.पुणे, व रणजित मिनानाथ देवकुळे धनकवडी बालाजीनगर, पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पोलिसांनी अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ४ साउंड बेस १ साउंड टाँप तसेच साउंड डि.जे मिक्सर, २ पॉवर अँम्प्लीफायर व इतर लाईट साहीत्य जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेव गायकवाड यांनी त्यांचे स्वतः चे विवाहकार्य निमित्त देवकुळे यांचे मालकीची वर नमूद केले प्रमाणे जप्त केले सर्व साउंड सिस्टीम व लाईट लावून मोठया आवाजाचे आवाजात गाणी वाजवुन अंदाजे ५० ते ६० हुन अधिक पुरुष व स्त्रिया या कोणतेही सामाजिक अंतर न राखता एकत्रित येवुन कार्यक्रम साजरा करीत असताना व इतरांचे मानवी जीवीतास धोकादायक असलेल्या रोगांचा संसर्ग पसरण्याचा संभव असलेली हयगईची व घातकी कृती करीत असताना व महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनवर्सन विभागाच्या दि १४/१०/२०२० रोजीच्या दिलेल्या रितसर आदेशाची अवेज्ञा करीत असताना मिळुन आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS