'सोमेश्वर' क्लबच्या सदस्यांची अनोखी भाऊबीज : गुळुंबे कुटुंबीयांना ६१ हजाराची मदत

Admin
'सोमेश्वर' क्लबच्या सदस्यांची अनोखी भाऊबीज : गुळुंबे कुटुंबीयांना ६१ हजाराची मदत

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी 

  करंजेपुल ता. बारामती येथील शरद गुळुंबे याचे अपघाती व  अवेळी निधन झाल्याने त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी आपण मदत करावी याहेतुने सोमेश्वर क्लब चे सदस्य एकत्र आले व त्यानी ५० हजार रु गोळा केले तसेच अक्षय शिंदे फौंडेशनचे संचालक संजय शिंदे यांनी अकरा हजार रुपये मदतीचा चेक गुळुंबे कुटुंबीयाना दिला .
      पुणे जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रमोद  काकडे, सोमेश्वर कारखाना माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते चेक व रोख रक्कम देण्यात आली .
          प्रास्ताविक ॲड .गणेश आळंदीकर यानी करुन सोमेश्वर क्लब च्या कार्याचा आढावा घेतला. वाघळवाडी चे माजी सरपंच सतीश सकुंडे यानी कै शरद गुळुंबे यांच्या पत्नीला  त्यांचे शिक्षण व गुणवत्ता उत्तम असल्याने जिल्हा परिषद आंगणवाडी साठी बाल कल्याण समितीद्वारे त्याना नोकरी द्यावी अशी विनंती क्लब तर्फे प्रमोद काकडे यांना केली. प्रमोद  काकडे यानी करंजेपुल चे सरपंच वैभव गायकवाड यानी गुळुंबे ताईच्या नोकरीचा प्रस्ताव द्यावा आपण जातीने त्याबाबत प्रयत्न करु व मुलीच्या शिक्षणासाठी मदत करु असे सांगीतले.यावेळी सोमेश्वर क्लब चे सदस्य  ,राज्य शिक्षक संघाचे सरचिटणीस केशव जाधव ,परवेझ मुलाणी ,मदनराव  काकडे ,रविंद्र पवार संतोष सोरटे ,हेमंत पवार ,फत्तेसिंग चव्हाण,कृणाल गायकवाड, संजय शिंदे आदी मान्यवरासह सर्व सदस्य हजर होते . धनंजय गायकवाड यानी आभार मानले .
To Top