शिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना

Admin
शिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना

माणिक पवार
भोर, दि.२२

दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिकार करताना एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला असून शिकारीसाठी डोंगरात गेलेल्या तरुणाचा सशाचा पाठलाग करताना बांधावरून पडुन स्वतःच्या हातातील बंदुकीची गोळी सुटून छातीत घुसल्याने मृत्यू झाला.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित दिपक भडाळे वय २५ ( रा. साळवडे ता.भोर ) या तरुणाचा या घटनेत मृत्यू झाला असून ही घटना शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास करंदी खेबा येथील वनात घडली आहे. याबाबत त्याचा भाऊ अतुल भडाळे यांनी राजगड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांनी माहिती देताना सांगितले की, दि.२१ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अमित भडाळे हा त्याचे मित्र अक्षय अंकुश जाधव व बाबाराजे काळुराम जाधव दोघेही ( रा.कांजळे ता.भोर ) यांच्यासह अमित आजोबांच्या नावाने असलेली बंदुक घेऊन कामथडी ते करंदी या रस्त्याने डोंगराच्या बाजूला शिकारीला गेले होते त्यांना ससा दिसल्यावर त्यास गोळी मारुन अमित त्याचा पाठलाग करत मागे पळत असताना बांधावरुन पडला त्या वेळी त्यांच्या हातातील बंदुकीमधुन गोळी उडुन त्याच्या छातीत घुसली मित्रांनी त्रास तातडीने नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात आणले तेथुन पुणे येथे उपचारासाठी नेले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील भेट देऊन माहिती घेतली.पुढील तपास पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कौस्तुभ सागवेकर करत आहेत.
To Top