एक महिन्याच्या विश्रांतीनंतर सोमेश्वर, वाणेवाडीत सापडले रुग्ण : तालुक्यात आज ३४ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात आता कोरोनाची रुग्णांची संख्या वाढत जात असल्याचे दिसत आहे, बारामतीच्या पश्चिम भागात एक महिन्याच्या विश्रांतीनंतर आज सोमेश्वरनगर आणि वाणेवाडी येथे एक एक रुग्ण सापडला आहे. तालुक्याचा आकडा ३४ वर गेला असून यामध्ये शहरातील १४ तर ग्रामीण भागातील २० जणांचा समावेश आहे. तर गेल्या चोवीस तासात एकाचा मृत्यू झाला आहे.
दिनांक २१ रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या ११० जणांचा rt-pcr तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहर व तालुक्यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह आलेला नाही. तसेच कालचे शासकीय दि (२२) एकूण rt-pcr नमुने ३७.
एकूण पॉझिटिव्ह-२ .
प्रतीक्षेत ००.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१८ त्यापैकी पॉझिटिव्ह -१० कालचे एकूण एंटीजन ७८ .
त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-२२.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३४
शहर-१४. ग्रामीण- २०.
एकूण रूग्णसंख्या-४६६६
एकूण बरे झालेले रुग्ण- ४३१२
एकूण मृत्यू-- १२४.
COMMENTS