मुरूम येथील डॉक्टराचे महिलेशी गैरवर्तन : डॉक्टराच्या निलंबनाची मागणी

Admin
मुरूम येथील डॉक्टराचे महिलेशी गैरवर्तन : डॉक्टराच्या निलंबनाची मागणी 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

मुरूम ता बारामती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका डॉक्टराने पेशेंट म्हणून आलेल्या एका महिला पेशेंट शी सेल्फीची मागणी करत मोबाईल नंबर मागितला. डॉक्टराचे हे वर्तन अत्यंत चुकीचे असून या डॉक्टराचे निलंबन करण्याची मागणी मुरूम ग्रामस्थांनी केली आहे. 
           याबाबत मुरूम ग्रामपंचायतने उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, बारामतीचे आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे. याबाबत मुरूम ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुरूम येथील  डॉ.संतोष पिसे (सी.एच.ओ.)या पदावर कार्यरत असुन या डॉक्टर संबंधात महिलांशी गैर व असभ्य वर्तणुक बाबत आरोग्य कर्मचारी कडुन तक्रारी आल्या आहेत. तसेच दवाखान्यात येणा-या पेशंटशी अतिशय उरमट पणे वागतात. व सतत कामावर गैरहजर असतात.  दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वा असाच गंभीर प्रकार एका महिलेशी सदरच्या डॉक्टरने केला. गोळ्या दिल्या नंतर जिल्हा परिषद ला फोटो पाटवावा लागतो असे सांगुन महिले सोबत सेल्फी फोटो काढला. तसेच त्या महिलेला मोबाईल नंबर ची मागणी केली.या सगळ्या गंभीर वर्तणामुळे गावातील महिला
मध्ये भिती निर्माण झाली आहे.तरी यामध्ये लक्ष घालुन
सदरच्या डॉक्टर वर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
To Top