निंबुत च्या शेतकऱ्यांचा नवीन फंडा : जेसीबीच्या साहाय्याने शेतीची नांगरट
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत ता बारामती येथील शेतकरी उदय नारायणराव काकडे यांनी त्यांच्या शेताची नांगरट जेसीबीच्या साहाय्याने केली आहे. जेसीबी च्या साहाय्याने काकडे हे नांगरट करत असल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी काकडे असे वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहेत.
नुकतेच उदय काकडे या शेतकऱ्यांने एकरात १०५ टन उसाचे उत्पादन घेतले आहे. पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीच्या पद्धती वापरल्या जात आहेत. यावेळी बोलताना काकडे यांनी सांगितले, आपल्या शेताची नांगरट जेसीबीच्या साह्याने केली त्यांना विचारले असता ते म्हणाले ट्रॅक्टर नांगरट खोल जात नाही परिणामी जमिनीची मशागत व्यवस्थित होत नाही त्यामुळे पिकाची वाढ होत नाही जमिनीचा पोत सुधारत
नाही जीसीबी च्या साह्याने शेत चाळल्यास जमिनीचा पोत सुधारतो व पिकाच्या वाढीस क्षेत्र भुसभुशीत होते आणि उत्पादन वाढण्यास मदत होते.