तिसरी मुलगी झाली म्हणून आईनेच बुडवून मारले सव्वा महिन्याच्या मुलीला : माळेगाव येथील घटना
बारामती : प्रतिनिधी
माळेगाव मधील सव्वा महिन्याच्या मुलीचा झालेला खून हा तिच्या आईनेच केला असून तिसरी मुलगी झाल्यामुळे तिने तिच्या पोटच्या मुलीचा बळी घेतला. माळेगाव पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील दिपाली संदीप झगडे ही महिला बाळंतपणासाठी माळेगाव येथे माहेरी गेली होती. तिला दोन मुली होत्या. तिसरी ही मुलगी झाल्याने ती अस्वस्थ होती. मुलगी झाल्यानंतर शेजाऱ्यांनी हिणवल्याच्या अस्वस्थतेतून तिथे घरा जवळील एका टाकीत तीने सव्वा महिन्याच्या राधाला टाकीत टाकून देऊन टाकी वरती झाकण लावून ठेवले होते.
मी झोपलेली असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पाण्याच्या टाकीत नेऊन टाकले असा कांगावा दिपाली हिने केला. सुरुवातीस पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला, मात्र त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात दिपालीची माहिती असंबध्द दिसू लागली, त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आणि खरे सत्य उजेडात आले. तिसरी मुलगी नकोशी झाल्यानेच दीपाली हिने तिचा खून केला. या निष्कर्षाप्रत पोलीस आले आणि त्यांनी दीपालीला आज अटक केली. या घटनेचा तपास सहाय्यक निरीक्षक श्री विधाते करीत आहेत.