वाणेवाडी, मुरूम, सोमेश्वर, वाघळवाडी सह ग्रामीण भागात १८ पॉझिटिव्ह : वाचा कुठल्या गावात किती रुग्ण
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दिवाळीनंतर कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. दिवाळीपूर्वी १० च्या आत असणारी संख्याने आता पन्नाशीचा टप्पा ओलांडला आहे.
याबाबत बारामतीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी सांगितले की, सध्या थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत व कोरोणाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टंसींग पाळणे अत्यंत आवश्यक आहे, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे व कोरोना पासून स्वतःच बचाव करावा.