निंबुत, वाणेवाडी, मुरूम सह तालुक्यात ४१ पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात पुन्हा कोरोना पाय पसरू लागला असून दवाखाने भरू लागले आहेत. काल दिवसभरात बारामती तालुक्यात ४१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील २३ तर ग्रामिण भागातील १८ जणांचा सामावेश आहे.
काल दि २६ चे शासकीय एकूण rt-pcr नमुने ४११ एकूण पॉझिटिव्ह-९ .
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -२६ त्यापैकी पॉझिटिव्ह -१२. कालचे एकूण एंटीजन ८८ . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-२० .
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४१.
शहर-२३ . ग्रामीण- १८.
एकूण रूग्णसंख्या-४८३६
एकूण बरे झालेले रुग्ण- ४४१८
एकूण मृत्यू-- १२५