मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग पाळून कोरोना मुक्त दिवाळी साजरी करूया : डॉ मनोज खोमणे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सध्या कोरोना रूग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी सुद्धा कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही तसेच सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत त्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढत आहे तरी सर्व नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व सोशल डिस्टंसींग पाळावे तसेच दुकानदारांनी सुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व आपले शहर कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती बारामती आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
आपण सर्वांनी दिवाळीच्या मंगल समयी मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग पाळून कोरोना मुक्त दिवाळी साजरी करूया व आरोग्य रुपी धनाचे जतन करूया........