गाळप हंगामात व्यत्यय आणायचा ही कृती समितीची नेहमीची सवय :.पुरुषोत्तम जगताप
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वीरित्या सुरु असून आपल्या श्री सोमेश्वर कारखान्याची सद्या ५००० मे.टन प्रतिदिनी गाळप क्षमता आहे. असे असतांनाही अधिकारी, कामगारवर्गाच्या सहकार्याने आपण तो सरासरी ६००० मे.टन प्रमाणे चालवितो. यावर्षी शेतकी विभागाच्या सर्व्हे नुसार जवळपास १२.५० ते १३ लाख मे.टन ऊस सभासदांचा कार्यक्षेत्रात उपलब्ध होणार आहे. एप्रिल अखेरपर्यंत कारखाना गाळप चालू ठेवून ११ लाख मे.टनाचे गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवलेले आहे. असे असताना कारखान्याकडे जो अतिरीक्त ऊस उपलब्ध आहे त्याचे गाळप करुन घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व कारखान्याचे मार्गदर्शक अजित पवार यांच्या सहकार्याने अतिरीक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या।प्रयत्नात संचालक मंडळ आहे.
परंतु असे असताना संचालक मंडळ एकीकडे अतिरीक्त्त ऊसाचे गाळपाचे नियोजन करीत असताना विनाकारण कारखान्याच्या सुरु।असलेल्या गाळप हंगामात व्यत्यय आणायचा ही कृती समितीची नेहमीची सवय
असून सोमेश्वरच्या अतिरीक्त ऊसाच्या गाळपाची जबाबदारी कृती समिती घेणार का? असा सवाल श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी शेतकरी कृती समितीस केला.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, आपला ५००० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेला कारखाना आपण ६००० मे.टनापेक्षा अधिकचे गाळप करुन चालवित आहोत. गेल्या ७ वर्षामध्ये कारखान्यामध्ये वेगवेगळया दुरुस्त्या व सुधारणा करुन जसे की, स्पॉण्ड, मोलॅसेस टॅक, इथेनॉल टैंक, इकॉपोरेटर बॉडी, व्हॅक्युम पॅन व इतर दुरुस्त्या केल्यामुळे कारखाना सुरु झालेपासून बंद होईपर्यंत गेल्या तीन हंगामात आपण ६००० पेक्षा अधिकचे गाळप करीत आहोत. या सर्व भांडवली गुंतवणूका आपल्या कारखान्याने कोणतेही कर्ज न घेता स्वभांडवलातून उभे केले आहे. जगताप पुढे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार
यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वरची यशस्वी वाटचाल सुरु असून गाळप हंगाम २०१९-२०२० करीता आपली एफआरपी रु.२७८९/- इतकी असताना सोमेश्वरने अंतिम दर कारखान्याच्या ताळेबंद, नफातोटापत्रका प्रमाणे रु.३०००/- प्र.मे.टन दिला आहे.एफआरपी पेक्षा रु.२११/- प्र.मे.टन जादा देणारा आपला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यात पहिलाच कारखाना आहे याचा आम्हा सर्वांना रास्त अभिमान आहे.
यापुर्वी आपण केलेली २० कोटीची किंमत चढ ऊतार निधीची तरतूद ही भविष्यातील।संकट काळामध्ये (उदा. साखरेच्या दरामध्ये घसरण झालेनंतर, एफआरपी देण्यासाठी) अडचण येवू नये. यासाठी केलेली तरतूद आहे.
जगताप पुढे म्हणाले की, सोमेश्वर कारखान्याने कामगारांसाठी स्टाफ क्वॉर्टर्स, सभासदांच्या मुलां-मुलींसाठी कॉलेज इमारत, मुलींकरीता एक सुसज्ज असे
वसतीगृह, सभासदांच्या ऊस वाहतुकीसाठी रस्ते, कारखान्याचे अधिकचे दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी केलेल्या दुरुस्त्या (उदा.स्प्रेपॉण्ड, मोलॅसेस टैंक, साखर गोडावून) यंत्रसामुग्री मधील विविध दुरुस्त्या हे सर्व कुठलेही कर्ज न घेता केले आहे आणि त्याचे चांगले रिझल्टही आपणास गेल्या दोन-चार हंगामात दिसत आहेत. ज्या कामांमुळे हे रिहाल्ट मिळाले ती कामे केली, याचा अर्थ संचालक मंडळाने चुक केली जगताप पुढे म्हणाले, आपल्या कारखान्याचा गाळप हंगाम २०१०-२०२१ सुरु झाला असून आतापर्यंतची गाळपाची परिस्थीती पाहता सोमेश्वर हा प्रतिदिनी ५०००
प्र.मे.टन गाळप क्षमता असतानाही ६२०० प्र.दिनी प्र.मे.टन गाळप क्षमतेने सुरु आहे. आपल्यापेक्षा अधिक क्षमतेचे कारखाने हे सद्या कितीने गाळप करीत आहेत याचा विचार कृती समितीने करावा. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून कारखान्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण करायचे व खोडसाळपणाचे आरोप करायचे हे उद्योग आता कृती समितीने थांबविले पाहिजेत. काही लोकांना सोमेश्वरचे यश आणि प्रगती पाहवत नाही म्हणून नैरोश्येपोटी मुठभर लोकांना घेवून विरोध करण्याचा हा।केविलवाणा प्रयत्न सभासद कदापि खपवून घेणार नाहीत. असे अध्यक्ष जगताप यांनी म्हनटले आहे.