सोमेश्वर कारखान्याच्या हंगाम २०२०-२१ च्या चुकीचे व दिशाभुल असलेले विस्तारीकरण प्रकल्पास मंजुरी देऊ नये : सतीश काकडे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा माजी संचालक व उसउत्पादक सभासद आहे. कारखान्याचे सन २०२०-२१ या वर्षात चुकीचे व दिशाभुल असलेले विस्तारीकरण.प्रकल्पास परवानगी देऊ नये अशी मागणी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी साखर आयुक्त यांच्याकडे केली आहे.
काकडे यांनी साखर आयुक्त यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे, कारखान्याच्या नियोजित विस्तारीकरणास.माझा व तमाम उस उत्पादक सभासदांचा विरोध आहे. कारण कारखान्याने चुकीच्या माहित्या आपल्या कार्यालयात दिलेल्या असुन त्या खालील प्रमाणे आपणापुढे मांडत आहे.
१) कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपलेली असुन चेअरमन व संचालक मंडळास कायद्याने कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तसेच ज्या सहकारी
साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. अशा सर्व साखर कारखान्यांना दि १९/०९/२०१३ रोजी कलम ७९ नुसार तत्कालीन साखर आयुक्त यांनी निर्देश दिलेले आहेत..त्यामुळे संचालक मंडळाने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेवु नये याबाबत आपले कार्यालयाने.परिपत्रक देखील काढलेले आहे. तसेच कोरोना महामारीमुळे मुदत वाढ दिलेल्या संचालक मंडळांना.राज्य सरकारनेही ठरावीकच निर्णय घेण्याचीच मुभा दिलेली आहे. ते फक्त कायद्याने प्रभारी
संचालक मंडळ आहे..२) सन २०१९-२० सालातील कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अद्यापपर्यंत झालेली नाही..त्यामुळे नियोजित विस्तारवाढी संदर्भात कोणतीही चर्चा किवा ठराव झालेला नाही.
३) कारखान्याने सन २०१८/१९ च्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ११२ कोटी ची सहविजनिर्मीतीसह
विस्तारवाढ करणेकरीता मंजुरी मिळवली होती. त्यावर गेली २ वर्षामध्ये कोणतीही कामे न करता
सदर कामे स्थगीत केली (सोबत ११२ कोटींचा संक्षिप्त DPR वार्षिक सभा ठराव नक्कल व
पेपरमधील कात्रणे जोडत आहे.) सदर ११२ कोटी कोजन सह विस्तारीकरणाचे वेगवेगळे नियम,
रचना असताना २ वर्षांनी वेगळा ७१ कोटी रूपयांचा DPR तयार करून मागील मान्यता ग्राहय
धरली जाते का? विशेष सर्व साधारण सभेने केलेला ठराव व नविन विस्तारीकरणासाठी
कारखान्याने तयार केलेला DPR हा पुर्णपणे वेगळा असुन मागील विस्तारीकरणाच्या ठरावाच्या
विसंगत आहे.
४) कारखान्याने विस्तारीकरण करणेसाठी जो ७१ कोटी रूपयांचा DPR आपल्या कार्यालयात दाखल
केला आहे त्यास संचालक मंडळाने सन २०१८-१९ चा (म्हणजेच २ वर्षापुर्वीचा विशेष सर्व.साधारण सभेचा ठराव जोडला आहे) जो पुर्ण चुकीचा व दिशाभुल करणारा आहे.
५) विशेष सर्व साधारण सभेने सन २०१८-१९ ला सभासदांनी ११२ कोटींची को-जनसह विस्तारवाढ
करणेसाठी मंजुरी दिलेली असताना संचालक मंडळाने विस्तारीकरणाचे काम का चालु केले नाही?
मागील २ वर्षापुर्वीचा मंजुरी मिळालेला ठराव जो नविन DPR ला जोडला आहे तो ग्राह्य धरता
येतो का?
६) सन २०१८-१९ च्या विशेष सर्व साधारण सभेचा ११२ कोटींचा को-जनसह विस्तारवाढ असा
ठराव असताना संचालक मंडळाला २०१८-१९ चा विशेष सर्व साधारण सभेने केलेला ठराव
मोडता येतो का? (कोणताही ठराव विशेष सर्व साधारण सभेने मंजुर केल्यानंतर तो कोणत्याही
संचालक मंडळाला रद्द करता येत नाही. तो या प्रभारी संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे मोडला
७) सन २०१८/१९ चा ठराव को-जनसह विस्तारवाढ असा होता परंतु आता कारखाना फक्त.विस्तारवाढ करणार आहे. त्यामुळे सन २०१८/१९ ठराव जो आता जोडला आहे. तो या.विस्तारवाढीस लागु होत नाही. तसेच सन २०१८/१९ च्या सभेने ११२ कोटी रूपयास मंजुरी दिली होती परंतु आज ७१ कोटी रूपयांचा फक्त विस्तारवाढीचा DPR तयार केलेला आहे. की
जो पुर्ण चुकीचा आहे.
८) सोमेश्वर कारखाना व VSI चे अधिकारी यांनी संगणमताने कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण
सभेच्या झालेल्या विषयांशी जाणीवपुर्वक विसंगत व चुकीचा DPR बनविला. त्यामुळे VSI च्या
अधिकाऱ्यांवर सुध्दा कारवाई होणे गरजेचे आहे.
९) विस्तारवाढ व को-जन प्रकल्पासाठी कारखान्याने दि.१/२/२०१८ रोजी घेतलेल्या विशेष सर्व
साधारण सभेमध्ये सभासदांनी को-जन सह विस्तारवाढीस परवानगी दिली होती. त्यामध्ये
कारखान्याचा जुना ४० टनी बॉयल चालविणेस भविष्यात महाराष्ट्र राज्य प्रदुषण मंडळाची
नोटीस आल्यास अडचण येवु शकते. असे काकडे यांनी अर्जात म्हनटले आहे.