सोमेश्वर आयसीयु हॉस्पिटलमध्ये हाडांची दुर्मिळ शस्त्रक्रिया पार
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कापडगाव लोणंद येथील एकाचे अपघातात एकाच बाजूचा खुबा व गुडघा निखळ्याची घटना परवा लोणंद परिसरात घडली त्या अपघातात रूग्णाचे एकाच बाजूचा खुबा (Hip Joint Dislocation) व गुडघा (Knee Joint Dislocation) निखळला. अशी एकाच बाजूचा खुबा व गुडघा निखळ्याची घटना ही वैद्यकीय विषयात दुर्मिळ समजली जाते. हर्डीकर हाॅस्पीटलेचे डाॅ सचिन नागापूरकर ह्यांनी ही शस्त्रक्रिया सोमेश्र्वर हॉस्पिटल वाघळवाडी सारख्या छोट्या ठिकाणी व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेल्या सोमेश्र्वर मल्टीस्पेशालटी रूग्णालयात केली. ह्यावेळी रूग्णालयाचे डाॅ. अनिल कदम आणि डॉ.सूरज सोनवलकर यांची मदत झाली.
पेशंट च्या नातेवाईक यांनी डॉक्टर यांचे मना पासून आभार मानून हॉस्पिटल बाबत आपले समाधान व्यक्त केले.