बारामती तालुक्यात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली

Admin
बारामती तालुक्यात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात  कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून नागरीक मात्र याकडे गांभीर्याने पहाता दिसत नाही. विना मास्क घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली बिनधास्तपणे नागरीक गर्दीच्या ठिकाणी फिरताना दिसत आहेत. थंडी, उन आणि ढगाळ या  बदललेल्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होत असून ज्येष्ठ नागरीक, लहान मुले साथीच्या आजाराने आजारी पडत आहेत. 
       ग्रामीण भागासह शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. मंदीरे, किराणा दुकाने, आठवडे बाजार, फळे- भाज्या यांच्यासह सर्व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, कपडे, चहा, हॉटेल याठिकाणी नागरिक गर्दी करत आहेत मात्र सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे याबाबत काळजी घेत नसल्याने सोमेश्वर परीसरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग आणि तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी हे नागरीकांना वारंवार नियम पाळण्याबाबत सूचना देत आहेत मात्र याकडे डोळेझाक होत असल्याने सोमेश्वरनगर परीसरात कोरोनाचा धोका वाढला आहे. सर्वांच्या सोयीसाठी सर्व व्यवहार सुरळीत केल्याने नागरीकांची सोय झाली आहे मात्र नियम आणि मास्क न वापरल्याने नागरीक स्वतः आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घातल आहेत.
       गेल्या महिनाभरापासून बारामतीच्या पश्चिम भागातील कोरोना रुग्ण संख्या घटली होती मात्र यात वाढ होताना दिसत आहे. सोमेश्वर कारखाना, करंजेपुल, वाणेवाडी मुरूम आणि परीसरात असलेल्या छोट्या- मोठ्या चौकात विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक व्यावसायिक यांनी मास्क शिवाय वस्तू देणे टाळले आणि पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई  केली तरच कोरोनाचा वाढता आलेख खाली येवू शकतो यासाठी सर्वांनी नियम पाळणे गरजेचे आहे.
To Top