सोमेश्वर'ने तात्काळ एकरक्कमी एफआरपी द्यावी : सतिश काकडे

Admin
'सोमेश्वर'ने तात्काळ एकरक्कमी एफआरपी द्यावी :   सतिश काकडे 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने महिनाभरात  १ लाख ५८ हजार मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण केलेले आहे. कायद्या प्रमाणे गाळप झालेल्या उसाला १४ दिवसात एफआरपी रक्कम देणे बंधनकारक आहे. अन्यथा सदर रक्कमेवर १५ टक्के व्याज द्यावे लागते. त्यामुळे ज्या सभासदांचे उस गाळपास आलेले आहेत त्यांच्या बँक खात्यावर एक आठवड्यात तात्काळ एफआरपी रक्कम वर्ग करावी. सभासदांच्या बँक खात्यात  रक्कम वर्ग न केल्यास वेळ प्रसंगी शेतकरी कृती समितीच्या वतीने काटा बंद किंवा धरणे आंदोलन करण्यात येईल व एफआरपी रक्कम उशिरा दिल्याने त्यावर व्याजाची मागणीही करण्यात येईल असा इशारा शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतिश काकडे यांनी दिला आहे.                        आंदोलनावेळी काही अनुचीत प्रकार घडल्यास त्यास अध्यक्ष, कार्यकारी संचालक व संचालक मंडळ जबाबदार राहिल असेही काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. काकडे यांनी सांगितले की, सोमेश्वरचे अध्यक्ष कायम कारखान्याची तुलना राज्यातील आघाडीच्या कारखान्यांबरोबर करतात मग कारखान्याने एकरक्कमी एफआरपी अजुन पर्यंत सभासदांच्या बँक खात्यात वर्ग का केली नाही. गेल्या आठवड्यात विस्तारीकरण करणे बाबत शेतकरी कृती समितीने वर्तमान पत्राव्दारे काही मुद्दे उपस्थित केले होते. याबाबत कारखान्यास निवेदन व लेखी पत्र देवूनही याबाबत कुठलाही खुलासा केलेला नाही. अध्यक्ष व
संचालक मंडळ यांनी,  विस्तारीकरणाबाबत साखर आयुक्त कार्यालयाची मंजुरी मिळो अथवा न मिळो कारखान्याने कारखाना कार्यक्षेत्रातील जेष्ठ व अभ्यासु
सभासद, संचालक मंडळ, व्हीएसआयचे अधिकारी तसेच कृती समिती यांच्या बरोबर विस्तारवाढ व इतर
बाबींसंबंधी तात्काळ बैठक घेवुन विस्तारीकरणाबाबत व इतर बाबतीत सभासदांच्या मनात जे प्रश्न आहेत त्याचा चेअरमन यांना खुलासा करता येईल व नंतरच विस्तारवाढी संबंधीचा अंतिम निर्णय घ्यावा. विस्तारवाढीवर चेअरमन जर बैठक बोलवत नसतील तर सोमेश्वर कारखान्याची निवडणुक जवळ आल्याने विस्तारीकरणा संबंधी मिटींग बोलविल्यास सभासदांच्या रोषाला सामोरे जाण्याची चेअरमन यांना भिती वाटत आहे का? कारखान्याच्या विस्तारीकरणा संबंधी आम्ही  कारखान्याला व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी पत्र दिलेले आहेत त्यासंबंधीचे खुलासे अद्यापपर्यंत केलेले नाहीत.

               अध्यक्ष व संचालक मंडळाने विस्तारीकरण व अनेक बाबींवर बैठक घेवुन जर समाधानकारक खुलासे केले तर सभासद व कृती समिती विस्तारीकरण व इतर बाबींबाबत सकारात्मक निर्णय घेईल. भविष्यात कारखाना अडचणीत येवु नये व जर कारखाना अडचणीत आला तर सभासद अडचणीत जाईल. राजकिय जोडे बाजुला ठेवुन सर्व सभासदांच्या प्रपंचाचा विषय असल्याने संचालक मंडळाने सकारात्मक पाऊल उचलुन योग्य तो निर्णय घ्यावा. मी पणा न करता सभासदांचे हित जोपासावे, चेअरमन यांनी विषयांतर करून हा राजकिय मुद्दा करू नये, विस्तारीकरणासह इतर बाबींवर चर्चा करावी असे आवाहन काकडे यांनी केले आहे. निवेदना विषयी सकारात्मक निर्णय न घेतल्यास चेअरमन व संचालक मंडळ हेकेखोरपणे वागल्यास व भविष्यात कारखाना अडचणीत गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन, कार्यकारी संचालक व संचालक मंडळावर राहील असेही काकडे यांनी म्हटले आहे.
.................. 

To Top