'सोमेश्वर' ची निवडणूक लढवणार नाही : सतीश काकडे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरच्या अध्यक्षांना हा कोणता तरी राजकिय स्टंट
वाटत असेल तर सन २०२०-२१ च्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मी पॅनेल सुध्दा टाकणार नसल्याचे स्पष्ट संकेत शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिले आहेत.
काकडे यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे या मध्ये त्यांनी सांगितले आहे, मला फक्त सोमेश्वर च्या सभासदांचे हित जोपासायचे आहे. मी कारखान्याचा संस्थापक सभासद असुन संस्थापक कुटूंबातील आहे. भविष्यात कारखाना टिकला पाहिजे हा माझा व कृती समितीचा आग्रह असुन मला कारखान्याच्या सभासदांचे हित महत्वाचे आहे निवडणुक महत्वाची नाही. यात कोणताही राजकिय स्टंट नाही. मी जे बोलतो तेच करतो माझी भुमिका बदलत नाही. असे काकडे यांनी म्हनटले आहे