साद संवाद स्वच्छता ग्रुपचे दिवाळी किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण उत्साहात
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता बारामती येथे साद संवाद स्वच्छता ग्रुप च्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
गेल्या तीन वर्षांपासून साद संवाद स्वच्छता ग्रुपच्या वतीने ही संकल्पना राबविण्यात येत आहे. शालेय मुलांना किल्याविषयी माहिती व्हावी यासाठी या ग्रुप च्या वतीने दर दिवाळीत किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दिवाळीमध्ये रायगड, प्रतापगड,जंजिरा आदी किल्ल्यांची प्रतिकृती उभ्या केल्या होत्या. या किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज वाणेवाडी येथील हनुमान मंदिरात पार पडला. यावेळी कृष्णाई पतसंस्था अध्यक्ष सुनील भोसले , इंद्रजीत पॉवरलाईन चे राजेंद्र जगताप, उपसरपंच संजय जगताप , adv. नवनाथ भोसले , शरद जगताप , राजेंद्र बोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत इंद्रनील शरद जगताप,
शिवम चंद्रशेखर भोसले,
यश संजय जगताप,
विश्वजित राजेंद्र जगताप,
साक्षी मनोज जगताप,
ओम संदीप जगताप,
रामेश्वर तरुण मंडळ यांनी बक्षीस मिळविले तसेच उत्तेजनार्थ म्हणून
ऋतुराज जितेंद्र भोसले,
आदित्य सचिन मोरे आणि
विराज राजेंद्र जगताप यांनी बक्षीस मिळविले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डी वाय जगताप यांनी केले तर आभार मनोज दीक्षित यांनी मानले