सुट्टीच्या दिवशी बारामतीचे प्रांताधिकारी जेंव्हा करतात ८१ किलोमीटर सायकलिंग........
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आज रविवार शासकीय सुट्टी, या दिवसासुद्धा इंधनबचतीचा व आरोग्यदायी जीवन लाभावे हा अनोखा संदेश देण्यासाठी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती ते निरा व पुन्हा निरा ते बारामती असा ८१ किलोमीटर चा सायकल प्रवास करत जनतेला अनोखा संदेश दिला.
या सायकल स्वारीची अचानक माहिती मिळताच सोमेश्वरनगर याठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे माजी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड, पुणे जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे उपाध्यक्ष गौतम काकडे, बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, सिद्धीराजनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी सोरटे तसेच नितीन यादव यांनी पुष्पहार देऊन स्वागत केले.
बारामती येथील बारामती सायकल क्लब ने आयोजित केलेल्या ८१ किलोमीटर च्या सायकल रॅलीत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना कांबळे म्हणाले की, बऱ्याच दिवसातून एवढ्या लांब पल्याची सायकलिंगची माझी ही पहिलीच वेळ असून पूर्वीच्या काळी नेहमी सायकलिंग होत होती, परंतु सध्या कामाच्या व्यस्त दिनक्रमातून जास्त सायकलिंग करणे शक्य होत नाही .जनतेला पर्यावरणपूरक व इंधन बचतीचा संदेश जावाया उद्देशाने आजची सायकलिंग सलग पार पडल्याचा आनंद होत असल्याचे कांबळे म्हणाले
COMMENTS