उसाच्या वजनातून एक टक्केच पाचट वजा करण्याचे आदेश

Admin
उसाच्या वजनातून एक टक्केच पाचट वजा करण्याचे आदेश

कोल्हापूर : प्रतिनिधी 

मशीनने तोडलेल्या  उसाच्या वजनातून ५ टक्के ऐवजी १  टक्केच पाचट (पाला) वजा करा, असे  आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक  डॉ. एस. एन. जाधव यांनी कोल्हापूर  विभागातील साखर कारखान्यांना दिले  आहेत. 
याबाबत आंदोलन अंकुश या  संघटनेने जिल्हाधिकारी व प्रादेशिक  साखर सह संचालकांकडे पाठपुरावा 
केला होता. मशीनने तोडलेल्या उसाच्या  वजनातून त्यात येणारा पाला गृहीत धरून ५ टक्के वजावट केली जाते.
यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने आंदोलन अंकुश'चे धनाजी चिडमुंगे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, साखर आयुक्त, साखर सहसंचालक आदींच्या पातळीवर पाठपुरावा केला. दरम्यान आंदोलन अंकुशच्या मागणीचा विचार करून दत्त शिरोळ व शाहू कागल या दोन कारखान्यांनी ५ ऐवजी १ टक्के मुळी बांधणी वजा
करण्याची अंमलबजावणी सुरू केली.
To Top