सोमेश्वरनगर येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे उद्या दि २० रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबीर सकाळी ९ ते ५ यावेळेत करंजेपुल येथील कै बाबासाहेब गायकवाड संकुलात पार पडणार आहे. शिबीराचे उद्घाटन कोविड काळात ज्यांनी कोविड योद्धे म्हणून काम केले असे सोमेश्वरनगर परिसरातील सर्व डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे शिबीर अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती तालुका, बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ व बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास रक्तदान केल्यानंतर एक पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात येणार आहे.
COMMENTS