उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑफलाईन पर्याय मिळाला : रणजीत शिवतरे
भोर : प्रतिनिधी
माणिक पवार
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरताना सर्व्हरच बंद पडत असल्याने इच्छूक उमेदवारांची मोठी दमछाक झाली होती. याबाबत सर्वच स्तरातून ऑफलाईनची मागणी होत होती. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा केल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेर ऑफलाईन पर्याय मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माहिती दिली असून यामुळे भावी गाव कारभाऱ्याना दिलासा मिळाला आहे.
ऑनलाईनचा बोजवारा उडाल्याने नामनिर्देशनपत्रासाठी इच्छूक उमेदवारांची मोठी दमछाक होत असून ऑफलाईनचा पर्याय देण्याची मागणी जिल्ह्यातील सर्वच स्तरातून होत आहे. ऑफलाईन पर्याय देण्यासाठी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी थेट जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना भेटून याबाबत चर्चा केली. यावर जिल्हाधिकारी देशमुख यांनी निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ऑफलाईन पर्याय देण्यासाठी कळविले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या दि. ३० शेवटची मुदत असून ऑफलाईन पर्याय देण्याची मागणी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी केली होती. सकारात्मक मागणी असल्याने निवडणूक आयोगाने बुधवारी शेवटच्या दिवशी सायकांळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत दिली असल्याची माहिती शिवतरे यांनी माहिती दिली.
गुलाबी थंडीच्या काळातही निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. शुक्रवारपासून जोडून आलेल्या सुट्ट्यामुळे तहसील कार्यालयातून मिळणारे कागदपत्रे मिळू शकली नसल्याने शेवटच्या दोन दिवसात परस्परविरोधी दोन्ही गटातील उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, पहिल्या दोन दिवसात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठीबोटावर मोजण्या इतपत उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. दत्तजयंतीचा ग्रामपंचायत इच्छूक उमेदवारांनी तोबा गर्दी होत आहे. ऑनलाईन पद्धतीने नामानिर्देशनपत्र भरण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने मुदत वाढवून ऑफलाईनचा पर्याय देण्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती. ऑफलाईन पर्याय मिळाल्याने अनेक उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे.
COMMENTS