बनावट शिक्के व कागदपत्रे बनवून फसवणूक : बारामती तालुक्यातील मुरूम येथील प्रकार
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम येथील राजेंद्र गुराप्पा गायकवाड यांनी ग्रामपंचायतची खोटी लेटरपॅड,शिक्के,घराचे उतारे बनावट कागदपत्रे तयार करून शुभम हौसिंग फायनान्स बारामती यांचेकडे कर्जप्रकरण दाखल केले.
सदर हौसिंग फायनान्स अधिकारी ग्रामपंचायतकडे कागदपत्रे चौकशीसाठी आले असता सदरची कागदपत्रे खोटी असल्याचे आढळून आलेचे निदर्शनास आले. राजेंद्र गुराप्पा गायकवाड हे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यामुळे एका शासकीय कर्मचाऱ्याने ग्रामपंचायतची व
हौसिंग फायनान्सची फसवणूक केलेली आहे.याबाबत प्राथमिक शिक्षक यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले आहे.