पंचायत इलेक्शन वेबसाईटची 'पंचायत' : ऑनलाईन निवडणूक अर्ज भरताना उमेदवार नाकीनऊ

Admin
पंचायत इलेक्शन वेबसाईटची 'पंचायत' : ऑनलाईन निवडणूक अर्ज भरताना उमेदवार नाकीनऊ 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत इलेक्शनचे अर्ज ऑनलाइन करून ,   निवडणूक आयोगाच्या पंचायत इलेक्शन या वेबसाईटवर ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मानसिक त्रास दिला आहे. गेले दोन दिवस सदरची वेबसाईट ही संत गतीने चालत असल्याने आणि वारंवार बंद पडत असलेले. इच्छुक उमेदवार पार्टी प्रमुख कार्यकर्ते नेटकॅफे महा ई सेवा केंद्रात रात्र रात्र पहाटेपर्यंत जागून अर्ज भरण्याची कसरत करत आहेत. शेवटची तारीख 30 डिसेंबर असल्याने उमेदवार म्हणतात 'भीक नको, पण कुत्रा आवर'  अशी गत या लोकांची झालेले आहे. उमेदवारीसाठी जर एवढी कसरत करावी लागत असेल तर पुढे काय?  हे प्रश्न लोकांपुढे पडत आहेत. त्यातही जे आरक्षित प्रवर्गातील उमेदवार उमेदवार आहेत. त्यांना Barti (Dr Babasaheb Ambedkar research and training institute) यांच्या वेबसाईटला जात पडताळणी चा अर्ज दाखल करून पाचशे रुपयाची फी भरण्याची पावती जात पडताळणी करण्यासाठी दिल्याची पावती सोबत जोडून अर्ज दाखल करावयाचा आहे परंतु अशी अवस्था झाली आहे की ही वेबसाइट गेले दोन दिवस पूर्णता बंद आहे. दुष्काळात तेरावा महिना अस झाले आहे. वरील अडचणी असल्याने आणि अउमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर असल्याने बऱ्याच ग्रामपंचायतीच्या आरक्षित आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज दाखल न करता आले. त्या जागा बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
To Top