बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अनिल हिरवे यांची निवड
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिल हरिदास हिरवे यांची बारामती तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली ,
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सदर नियुक्ती पत्र देण्यात आले ,यावेळी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, तालुका अध्यक्ष राहुल वाबळे, जिल्हा परिषद सदस्य भरत खरै, सोमेश्वर सहकारी कारखाना संचालक गणेश चांदगुडे, महात्मा फुले समता परिषद तालुका अध्यक्ष सचिन भुजबळ, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे सुयश जगताप, युवा नेते अतुल खैरे , मा: तंटामुक्ती अध्यक्ष अमोल बारवकर ,सोशल मिडीया प्रमुख जावेद सय्यद ,अन्सार शिकिलकर सह अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते,
सुपे गावातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे युवकांच्या सदैव संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निमित्त प्रयत्नशील असल्याने त्यांची कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ,त्यांची सुपे गावामध्ये ओळख ही एक फोन व अनिल हिरवे सामाजिक कार्यासाठी हजर अशी आहे ,सदर कामाचा लेखाजोखा पाहता या पदाची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर सोपवली आहे,
यावेळी बोलताना हिरवे म्हणाले की पक्षांने दिलेली जबाबदारी माझ्या कामाची पावती असून नेहमीच सामाजिक कार्य व पक्ष ध्येयधोरणे युवका मार्फत तळागाळात पोहोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल असे मत हिरवे यांनी व्यक्त केले ,
COMMENTS