ऊस तोडणीसाठी पैसे घेतल्यास तोडणी बिलातून पैशाची वसुली : या कारखान्याने घेतला महत्वपूर्ण निर्णय
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस तोड व वाहतुकीचा रितसर करार केलेल्या मुकादमांना परिपत्रक काढण्यात आले, असून आपल्या टोळीतील ऊसतोड मजुरांनी शेतकऱ्याकडून पैसे घेतल्याची रीतसर तक्रार कारखान्याकडे आल्यास ऊस तोडणी बिलातून रक्कम वसूल करून शेतकऱ्यांना देण्यात येईल. असे पत्रकात म्हटल्याने शेतकऱ्यांनानमोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वृत्त असे की, सध्या ऊसतोड मजूर शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीसाठी प्रचंड पैशाची मागणी करत असल्याचे कारखान्याकडे तक्रारी जात आहेत . यामुळे कारखान्याने मुकादमांना पत्रक काढले असून, पत्रकात म्हटले आहे की, आपण गाळप हंगाम २०२० - २०२१ करिता ऊसतोड व वाहतुकीचा रीतसर करार करून आपले वाहन, टोळी ऊसतोड वाहतूक चालू आहे .ऊसतोड करण्यासाठी ऊस उत्पादकाकडून मजूर पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी ऊस उत्पादक करत आहेत आपण आपल्या टोळीतील मजुरांना ऊस तोडणीसाठी पैसे न घेणेबाबत सक्त सूचना कराव्यात, सुचना देऊनही यानंतर ऊस तोडणीसाठी ऊस उत्पादकाकडून पैसे घेतले, व ऊस उत्पादकाने लेखी तक्रार दिल्यास सदर रक्कम ऊस तोडणी बिलातून वसूल करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येईल व नंतर आपली तक्रार ऐकून घेतली जाणार नाही असे म्हटले आहे. कारखान्याच्या निर्णयाचे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची होनारी लूट थांबण्यास मदत होणार आहे.