शाळेतील साहित्य चोरणारी टोळी तडीपार : वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे प्रकाश ऊर्फ प्रशांत चंद्रकांत लोंढे, सुनिल बाळासोब माकर, अजय दत्तात्रय मांढरे सर्व रा. उंडवडी सुपे, ता. बारामती, जि.पुणे. या सर्व जनांनी आपली
टोळी निर्माण करुन आपले टोळीची दहशद निर्माण करणे करिता तसेच आपले आर्थिक प्राप्ती करणेसाठी
घरफोडी चोरी तसेच चोरी या सारखे मालमत्तेचे गुन्हे करतात. आपले आर्थिक प्राप्ती साठी तसेच दहशद निर्माण करणेकरिता गुन्हेगारांची टोळी निर्माण केली असून ते टोळीचे माध्यमातुन घरफोडी, चोरी या सारखे मालमत्तेचे गुन्हेगारी कृत्ये अव्यहातपणे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात सुरु ठेवलेली आहेत. ते त्यानी करितअसलेल्या कृत्यास व्यावसायिकतचे स्वरुप दिलेले आहे. त्यामुळे सामान्य लोकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत.
व बरीच बेरोजगार तरुण मुले हे अशा कृत्यामुळे त्यांचेकडे आकृष्ट होवून त्यांचे टोळीत समाविष्ट होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थीक नुकसान होत होत आहे. त्यामुळे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे सहा. पोलीस निरीक्षक यांनी नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सो बारामती, यांचे मार्फत सदर इसमांना तडीपार करणेबाबत डॉ. अभिनव देशमुख सो, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांनी सदर इसमा विरुध्दचा प्रस्ताव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा चौकशी अहवाल, गोपनीय साक्षीदार जबाब, अभिलेखावर असलेले गुन्हे या सर्वांचे
अवलोकन करुन डॉ. अभिनव देशमुख सो, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांचे न्यायालय तथा पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५
प्रमाणे पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर तालुका पुर्ण हद्द तीन महिन्या करिता हद्दपार केलेले आहे. प्रकाश ऊर्फ प्रशांत चंद्रकांत लोंढे, वय २६ वर्षे
सुनिल बाळासोब माकर, वय २७ वर्षे अजय दत्तात्रय मांढरे, वय २५ वर्षे, सर्व रा. उंडवडी सुपे, ता. बारामती, जि.पुणे. सदरची कामगीरी मा. डॉ. अभिनव देशमुख सो, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण मिलिंद मोहिते अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, पुणे ग्रामीण, नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सो बारामती यांचे मार्गदर्शनाखाली सोमनाथ लांडे, सहा. पोलीस निरीक्षक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांनी पार पाडली.
COMMENTS