विरवाडी-दिडघर उपसरपंचपदी विशाल शिळीमकर बिनविरोध
भोर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------------
विरवाडी दिडघर केतकावणे ( ता. भोर ) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल शिळीमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे. निवडीप्रसंगी सर्वांना विश्वासात घेऊन गावामध्ये विकासकामे करणार तसेच महिला सक्षमीकरण करणार असल्याचे सांगितले.
विरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच समिर दिघे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी मंगळवारी दि. २२ रोजी निवडणुक झाली यावेळी. सरपंच सुनिता सोंडकर, सदस्य अमर इंगवले, ज्योती बांदल, समीर दिघे, सविता सोंडकर, स्मिता शिळीमकर, मंदा खंडाळकर उपस्थित होते निवडणुकीच्यावेळी उपसरपंचपदासाठी विशाल शिळीमकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी ग्रामसेवक अंकुश लाम्हटे यांनी विशाल शिळीमकर यांना उपसरपंचपदी बिनविरोध विजयी घोषित केले.
या बिनविरोध निवडीसाठी माजी सरपंच विजय शिळीमकर, राजतोरण मिसळ हाउसचे उद्योजक सचिन बांदल, गोकुळ दिघे, भैरु दिघे, गणेश शिळीमकर, नाना शिळीमकर, समीर शिळीमकर, शांताराम दिघे आदींनी प्रयत्न केले. निवडीनंतर जेष्ठ मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच विशाल शिळीमकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शिळीमकर यांनी सांगितले कि, उपसरपंच पदाच्या माध्यमातुन ग्रुप ग्रामपंचायतीच्या विरवाडी,दिडघर,केतकावणे या तीनही गावामध्ये विकासाच्या कामासाठी प्रयत्न करणार असुन नविन ग्रामपंचायत कार्यालयासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले व बिनविरोध निवड केल्या बद्दल सर्वांचे अभार मानले.
COMMENTS