प्रेमसंबधातुन पत्नीनेच केला नवऱ्याचा खुन : सुपे-कुतवळवाडीतील घटना
सुपे : प्रतिनिधी
गेली दोन वर्षापासुन सुरु असलेल्या प्रेमसंबधात अडथला ठरत असलेल्या नवऱ्याचा खुन करुन कंबरेला दगड बांधून विहिरीत ढकलुन दिल्याची घटना शनिवारी ( २८ नोहेंबर ) बारामती तालुक्यातील कुतवळवाडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी आणि भावास अटक केली आहे.
रामदास विठ्ठल महानवर ( रा. कुतवळवाडी, ता. बारामती ) असे विहिरीत मृत्युदेह सापडलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, रामदासचे वडील विठ्ठल लक्ष्मण महानवर ( वय ६५ रा. कुतवळवाडी ) यांनी पोलिसात फिर्याद दिल्याचे पोलिस कॉंस्टेबल विशाल नगरे यांनी दिली.
बुधवार ( दि. २५ नोहेंबर ) पासुन माझा भाऊ रामदास बेपत्ता असल्याचे आरोपी गणेश महानवर हा पोलिसांकडे बतावणी करत होता. त्यानंतर शनिवारी ( दि. २८ ) दुपारी चारच्या दरम्यान रामदासचा मृत्युदेह कुतवळवाडी गावच्या हद्दीतील सकटवस्ती नजीक असणाऱ्या विहिरीत तरंगताना आढळुन आला. यावेळी रामदासच्या कंबरेला मोठा दगड बांधण्यात आला होता. तर डोक्यावर मोठे वार करुन जिवे मारुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र आरोपी हा पोलिसांकडे जावुन रामदास बेपत्ता असल्याची बतावणी करत होता. पोलिसांना त्याचा संशय येवुन ताब्यात घेतल्यावर पोलिसी हिसक्याला त्याने तसेच मयताची पत्नी हिने आमचे प्रेमसंबध असुन त्याचा अडथला ठरत असल्याची कबुली दिली.
याप्रकरणी रामदासची पत्नी सुनिता रामदास महानवर, भाऊ गणेश विठ्ठल महानवर या दोघांना ३०२, २०१ च्या कलमाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान बारामतीचे विभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, वडगाव निंबाळकरचे सपोनी सोमनाथ लांडे आदींनी येथील घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश कवितके करीत असल्याची माहिती सुप्याचे पोलिस कॉंस्टेबल विशाल नगरे यांनी दिली.