ग्रामपंचायत धुमशान : नीरा ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ८८ अर्ज दाखल.

Admin
ग्रामपंचायत धुमशान : नीरा ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ८८ अर्ज दाखल.

पुरंदर : प्रतिनिधी

 पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. १७ सदस्यसंख्य असलेल्या नीरा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी तब्बल ८८ इच्छुक उमेदवारांनी आज पर्यंत अर्ज भरले आहे. 

  ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी दि.२३ डिसेंबर ते दि.३० पर्यंत अर्ज स्विकारले गेले. दि. २३ रोजी ० अर्ज, २४ रोजी ४ अर्ज, २८ रोजी ६ अर्ज, २९ रोजी ३२ अर्ज आणि ३० रोजी ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आज बुधवार दि.३० रोजी सायंकाळी ५:३० पर्यंत ८८ इच्छुक उमेदवारांनी निवडणूकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
To Top