ग्रामपंचायत धुमशान : खंडोबाचीवाडीला ७ जागेसाठी २९ अर्ज
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आज ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत साठी एकूण ७ जागेसाठी २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन पॅनल असून या दोन पॅनल मध्ये २२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर भाजप पक्षाच्या वतीने ७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या ग्रामपंचतीला एकूण ३ वार्ड असून ७ जागेसाठी २९ उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत.