या साखर कारखान्याची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा : फक्त ५० सभासदांना उपस्थित राहता येणार
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने उद्या गुरुवार दि ३१ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे.
केंद्र शासनाच्या नियमानुसार या कारखान्याने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. मात्र या सभेसाठी फक्त ५० सभासदांच उपस्थित राहता येणार आहे. यासाठी कारखान्याने सभासदांचे अर्ज मागविले आहेत. ५० पेक्षा जास्त सभासदांचे अर्ज आल्यास चिट्ठी पद्धतीने सभासदांची नावे काढण्यात येतील.
उर्वरित सभासदांना ऑनलाइन प्रणालीने सभेत सहभागी होता येणार आहे.