पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांचेकडून उद्या बंद चे आवाहन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दिल्ली येथे सुरू असलेले शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी उद्या दि ८ रोजी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांनी कडकडीत बंद पाळून या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केले आहे.
केंद्र सरकारने शेती धोरणात काही जाचक अटी रद्द करण्याबाबत पंजाब आणि हरियाणा येथील हजारांच्या संख्येने शेतकरी गेल्या १२ दिवसापासून रस्त्यावर उतरला असून या आंदोलनाला पाठिंब्यासाठी उद्या देशातील सर्वच शेतकरी संघटना कडून भारत बंद ची हाक दिली आहे. यासाठी उद्या दि ८ रोजी सर्वांनी बंद पाळून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन काकडे यांनी केले आहे.