नाताळनिमित्त क्षेत्र मोरगाव येथे भाविकांची मांदियाळी

Admin
नाताळनिमित्त क्षेत्र मोरगाव येथे भाविकांची मांदियाळी

मोरगाव : प्रतिनिधी

 मोरगाव ता. बारामती येथे  आज नाताळानिमीत्ताने  दिवसभर  भाविकांची मांदियाळी सुरू होती. सलग सुट्टयांमुळे    मयुरेश्वर दर्शनासाठी  राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आले होते . रात्री उशीरापर्यंत हजारो भावीकांनी श्रींचे दर्शन घेतले असल्याची माहीती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली 


 दरम्यान आज छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती  चोरडिया यांनी  सपत्नीक  श्रींचे  दर्शन घेतले . नाताळच्या निमित्ताने आज पहाटेपासूनच भाविकांची गर्दी सुरू झाली होती . पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य दरवाजा दर्शनासाठी  खुला करण्यात आला .त्यानंतर  सकाळी सात वाजता व दुपारी बारा वाजता श्रींची पूजा करण्यात आली . दिवसभर पुणे  ,सातारा ,सांगली ,सोलापूर ,कोल्हापूर , छत्तीसगड , अहमदनगर , मुंबई , ठाणेसह अनेक भागातून भाविक भक्त दर्शनासाठी आले होते .


कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे  राज्यशासनाच्या आदेशान्वे  दर्शनासाठी येणाऱ्या १० वर्षाखालील मुलांना व जेष्ठ नागरीकांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता  .देवस्थानच्या वतीने आज होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा रक्षक , सफाई कामगार , पिण्याचे पाणी आदी सोय केली होती . मास्क लावणाऱ्या भावीकांनाच मंदिरात प्रवेश दिला जात होता . तसेच  हातावर सॅनीटायझर घेणे बंधनकारक केले होते . रात्री उशीरापर्यंत  भावीकांची गर्दी सुरु होती .

......................................................

To Top