मोढवे गावच्या परिसरातील खडी क्रशर बंद करण्याची मागणी : मोढवे ग्रामस्थांना तोंड दाबून बुक्यांचा मार

Admin
मोढवे गावच्या परिसरातील खडी क्रशर बंद करण्याची मागणी : मोढवे ग्रामस्थांना तोंड दाबून बुक्यांचा मार

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------------

बारामती तालुक्यातील मोढवे गावच्या परिसरामध्ये तीन खडीमशिन राजरोसपणे चालू आहेत. खडी वाहतूक करणार्या मोठ्या गाड्यांमुळे राख ते (मोटेवाडी) मोढवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे मोढवे परिसरातील ग्रामस्थांना त्याचा खूप मोठा फटका व त्रास सहन करावा लागत आहे. येथील जमिनी खडी मशीनमध्ये होणाऱ्या धुळीमुळे नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पिकांवर धुळीचा खूप मोठा परिणाम होत आहे. तेथे होणाऱ्या स्फोटामुळे काही घरांना तडे गेले आहेत. आजूबाजूला शेतामध्ये काम करीत

असताना धुळीमुळे काम करणेही शेतकऱ्यांना अवघड झाले आहे व तेथे सतत स्फोट घडवल्यामुळे त्या परिसरामध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली  आहे, त्यामुळे जमिनी खराब होते चालल्या आहेत, आम्ही कसे जगायचे, आमचा शेतीचा, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, आम्हाला या त्रासामुळे गाव

सोडण्याची वेळही येऊ शकते अशी भीती मोटेवाडी व आसपासच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आम्हाला न्याय मिळावा अशी विनवणी येथील शेतकरी करत आहेत. येत्या १५ दिवसात या सर्व खडी मशीनवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांसहित बारामती तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर, माणिकराव काळे, तानाजी कोळेकर, सुहास टकले, दशरथ कोळपे यांनी दिला आहे.
To Top