भोर तालुक्यात बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीला कुलदीप कोंडे कडून पाच लाखाचे बक्षीस

Admin
भोर तालुक्यात बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीला कुलदीप कोंडे कडून पाच लाखाचे बक्षीस

भोर : प्रतिनिधी
माणिक पवार 

 दोन दिवसांच्या असणाऱ्या निवडणुकांमुळे गावांमध्ये वर्षांनुवर्षे गटातटाचे  वातावरण आणि वादविवाद कायम राहत असल्याने गावामध्ये विकास होत नाही. या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील बिनविरोध होणाऱ्या प्रत्येकी ग्रामपंचायतीला तब्बल पाच लाखाचे बक्षीस जिल्हा परिषदच्या निधी द्वारा देण्याची मेगा ऑफर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे यांनी केली आहे.
भोर तालुक्यात ७४ ग्रामपंचायतीची निवडणुक येत्या १५ जानेवारी रोजी पार पडत आहे. अनेक गावात यासाठी जोरदार घडामोडी चालु असून एकमेकांच्या विरोधात निवडणुक लढवण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. गावागावात वादविवाद होत असतात अशाही परिस्थितीत काही गावातील नागरीक मात्र समंजसपणा दाखवत गावच्या विकासासाठी निवडणुक बिनविरोध पार पाडत आहेत यांना प्रोत्साहन मिळण्यसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे यांनी तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्या त्यांच्या पत्नी शलाका कोंडे यांनी बिनविरोध निवडणुक होणाऱ्या गावासाठी पाच लाख रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले आहे.

कुलदीप कोंडे यांनी याबाबत म्हणाले कि, गावामधील राजकारणाने वर्षानुवर्षे गावात वादविवाद होत असून, कलह, हाणामारी होऊन आयुष्यभरासाठी वाद निर्माण होत आहेत, यामुळे गावच्या विकासाला सुद्धा खिळ बसत आहे. यासाठी गावपातळीवरील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मी नेहमी आग्रही राहत असून गावपातळीवर कोणताही पक्ष किंवा गटतट न मानता नागरीकांनी एकत्र येऊन विकासासाठी सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांकडे आग्रह ठरवून गावामधील विकास कामे करुन घेतली जावी. निवडणुकीमुळे आलेल्या कटुतेमध्ये हे शक्य नसल्याने निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे यांच्या वतीने बिनविरोध निडवणुक पार पाडणाऱ्या गावच्या प्रतिनिधींचा आम्ही शिवसेनेच्या वतीने सत्कार करणार असुन जिल्हा परिषद फंडातुन त्या गावास पाच लाख रुपयांचा विकास निधी देण्यात येणार आहे. तालुक्यातील निवडणुक होत असलेल्या सर्वच्या सर्व ७४ गावांनी देखिल बिनविरोध निवडणुक पार पाडली तरी त्या सर्व गावांना हा प्रत्येकी पाच लाखाचा बक्षिस निधी दिला जाईल यासाठी कोणताही पक्षीय भेदभाव केला जाणार नाही अशी माहीती कुलदीप कोंडे यांनी दिली आहे.

To Top