कात्रज डेअरीकडून दूधउत्पादकांना नवीन वर्षाचे गिफ्ट : या तारखेपासून लिटरमागे १ रुपयांची वाढ

Admin
कात्रज डेअरीकडून दूधउत्पादकांना नवीन वर्षाचे गिफ्ट : या तारखेपासून लिटरमागे १ रुपयांची वाढ

पुणे : प्रतिनिधी

जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतक-यांना पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (कात्रज डेअरी ) नवीन वर्षाची अनोखी भेट दिली आहे. खाजगी दूध संघाकडून खरेदी दर कमी केला जात असताना कात्रज दूध संघाने आपल्या शेतक-यांना १ जानेवारी पासून गायीच्या दुधासाठी प्रति लीटर १ तर म्हैशीच्या दुधासाठी प्रति लीटर २  रुपयांची वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे यांनी सांगितले.

खरेदी दरात वाढ केली असली तरी विक्रीच्या दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे हिंगे यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना व्हायरस संसर्गाचे पार्श्वभूमीवर बुधवारी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा घेणारा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा राज्यातील पहिला सहकारी संघ आहे.
To Top